विज्ञान विभाग
Staff
Physics
Chemistry
Mathematics
Biology
उद्योगश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील
ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स ॲंड कॉमर्स
विज्ञान विभाग
जून 1975 पासून महाराष्ट्र शासनाचा नवीन शैक्षणिक आकृतिबंध सुरू झाला आणि शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथे विज्ञान शाखा मिळविण्यास संस्था यशस्वी झाली. जून 1975- 76 या शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेची पहिली बॅच सुरू झाली. विज्ञान विभागासाठी प्रयोगशाळेची आवश्यकता होती त्यासाठी संस्थेने 50 हजार रुपये खर्चून तीन स्वतंत्र प्रयोगशाळा व पेट्रोल गॅस प्लांट उभारण्यात आला. शैक्षणिक वर्ष २००७-०८ मध्ये पालक शिक्षक संघाने दिलेल्या निधीमधून या प्रयोगशाळांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारत बांधकामासाठी प्रमुख्याने नडगिवे गावचे सुपुत्र उद्योगश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील आणि परिवारातर्फे पाच लाख रुपयांची देणगी संस्थेला मिळाली आणि त्यामुळे उद्योगाश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील यांचे नाव 29 एप्रिल 1999 रोजी ज्युनियर कॉलेज इमारती साठी समारंभपूर्वक देण्यात आले.
विज्ञान विभागामध्ये सुरवातीच्या कालावधीमध्ये भौतिकशास्त्र विषयासाठी श्री कदम सर, रसायनशास्त्र विषयासाठी श्री मठपती सर ,जीवशास्त्र विषयासाठी श्री चौगुले सर आणि गणित विषयासाठी श्री माने सर या अभ्यासू व विज्ञाननिष्ठ शिक्षकांचे योगदान लाभले.आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी विविध अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच कृषी क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवीत आहेत. सुरुवातीला सोळा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या विज्ञान विभागांमध्ये सध्या अकरावी व बारावी असे मिळून 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सध्या विज्ञान विभागाचे कामकाज भौतिकशास्त्र विषयासाठी श्री सुरेश करांडे सर, रसायनशास्त्र विषयासाठी श्रीमती काझी मॅडम, जीवशास्त्र विषयासाठी श्रीमती सारिका महिंद्रे मॅडम व गणित विषयासाठी श्री रामचंद्र लोके सर हे सर्व आपापल्या विषयांचे अध्यापन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करीत आहेत.गेल्या दहा वर्षापासून विज्ञान विभागाचा बारावी चा निकाल १००% आहे.
आज आमच्या विज्ञान विभागतील विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, नर्सिंग, फार्मसी आणि कृषी या विषयांचे शिक्षण घेत आहेत. आमच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी सुरज दामाजी गुदळे हा बी.टेक. अभ्यासक्रमात गोल्ड मेडलिस्ट आहे व पुढील शिक्षण आयआयटी रूरकी( उत्तराखंड) येथे हायड्रॉलॉजी हा विषय घेऊन पूर्ण करीत आहे.विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी नम्रता संतोष विचारे हिने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविलेले आहेत. विज्ञान विभागातील सर्व शिक्षक हे बोर्ड अभ्यासक्रमाबरोबरच एन इ इ टी, जेईई, एम एच टी सी इ टी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उत्तम रित्या करीत आहेत.
विषय
इयत्ता अकरावी
- मराठी
- इंग्लिश
- गणित/भूगोल
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- जीवशास्त्र
- पर्यावरण
- आरोग्य व शारीरिक शिक्षण
इयत्ता बारावी
- मराठी
- इंग्लिश
- गणित/भूगोल
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- जीवशास्त्र
- पर्यावरण
- आरोग्य व शारीरिक शिक्षण