रसायनशास्त्र प्रयोगशाळा

         आपल्या संस्थे मध्ये 1975-76 झाली कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखा सुरू झाली. त्याच वर्षी रसायनशास्त्र प्रयोगशाळा स्वतंत्र वर्गखोली मध्ये सुरू करण्यात आली. शिक्षक पालक संघाच्या वतीने २००७-०८ मध्ये रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे नूतनीकरण करण्यात आले. नवीन प्रयोगशाळा सुसज्ज व सर्व उपकरणांनी युक्त अशी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील रसायनशास्त्र विषयाचे सर्व प्रयोग साहित्य यामध्ये उपलब्ध आहे. येथे इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी श्रीमती काझी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रात्यक्षिके स्वतः करीत असतात. अभ्यासक्रमानुसार व तसेच अभ्याक्रमपूरक वैज्ञानिक प्रकल्प येथे तयार केले जातात. प्रयोगशाळा अद्यावत ठेवणेसाठी सुधारित अभ्यासक्रमानुसार नवनवीन प्रयोग साहित्य खरेदी केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते. या प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून श्री कोंडविलकर व प्रयोगशाळा परिचर म्हणून श्री मोसमकर हे आपले काम उत्तम रित्या करतात.