भौतिकशास्त्र प्रयोगशाळा–
भौतिकशास्त्र विषयाची सुमारे पंधराशे स्क्वेअर फिट आकाराची एक स्वतंत्र, सर्व साहित्याने परिपूर्ण अशी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिकासाठी आवश्यक असणारे व्होल्टमीटर, अॅमीटर, गलव्हॅनोमिटर, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, स्क्रू गेज, मल्टीमीटर, ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप हे प्रयोगशळा मोजमापन उपकरणे ट्रांजिस्टर, डायोड, झेनर डायोड, कॉनवॅक्स आणि कॉनकेव्ह लेन्स असे विविध शास्त्रीय साहित्य उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे भौतिकशास्त्र विषयांतर्गत विविध प्रयोग तपासणी कीट व मोडेल्स उपलब्ध आहेत.
शैक्षणिक वर्ष २००७-०८ मध्ये या प्रयोगशाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेचा उपयोग इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी प्रात्यक्षिके, प्रकल्प तायार करणे यासाठी करतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके समजावून देण्याचे काम श्री. सुरेश करांडे सर उत्तमरित्या करतात. या प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून श्री. नितीन कोंडविलकर व प्रयोगशाळा परिचर म्हणून श्री. सिद्धार्थ मोसमकर हे आपले कर्तव्य उत्तमरित्या करीत आहेत.