जीवशास्त्र प्रयोगशाळा
जीवशास्त्र विषयाची स्वतंत्र, प्रशस्त, सुसज्ज व अद्ययावत अशी सर्व उपकरणांनी युक्त परिपूर्ण प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा जीवशास्त्र विषयाशी निगडित सर्व प्रकारच्या स्लाईड्स, डिसेक्शन बॉक्स, सिम्पल मायक्रोस्कोप, कोंपाऊंड मायक्रोस्कोप जीवावशेषांचे जतन केलेले नमुने (स्पेसिमेन), मानवी हाडांचा सांगाडा (ह्यूमन स्केलेटन), मॉडेल्स चार्ट अशा अनेक साहित्याने परिपूर्ण आहे.
या प्रयोगशाळेत इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी उत्तम रित्या प्रात्यक्षिक करीत असतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते. वनस्पती विच्छेदन प्रक्रियेद्वारे वनस्पती शरीरांतर्गत रचनात्मक माहिती प्रत्यक्षरित्या मिळण्यास मदत होते. मानवी शरीरांतर्गत होणाऱ्या विविध आजारांची माहिती वेगवेगळ्या घेतल्या जाणाऱ्या प्रायोगिक चाचण्या द्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या मिळते. प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या पेशींची संरचना प्रत्यक्षरीत्या अभ्यास मुळे विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक रित्या अभ्यासाची आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके समजावून देण्याचे कार्य सौ सारिका महिंद्रे मॅडम उत्तम रित्या करतात. या प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून श्री नितीन कोंडविलकर व प्रयोगशाळा परिचर श्री सिद्धार्थ मोसमकर हे आपले काम उत्तम रित्या करीत असतात.