ऑटोमोबाईल वर्कशॉप
ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत विषयासाठी ऑटोमोबाईल वर्कशॉप ची निर्मिती करण्यात आली आहे हे वर्कशॉप एक हजार स्क्वेअर फिट जागेमध्ये वसलेले असून यामध्ये तीस विद्यार्थी बसण्याची व प्रात्यक्षिक करण्याची व्यवस्था आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विषयाचे सहज आकलन व्हावे म्हणून टू- स्ट्रोक पेट्रोल इंजिन, फोर- स्ट्रोक पेट्रोल इंजिन, फोर -स्ट्रोक डिझेल इंजिन तसेच वाहनाच्या इतर भागांची सेक्शनल मॉडेल उपलब्ध आहेत.त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्यासाठी वाहनाच्या सर्व जुन्या सुट्या भागांची मांडणी व व्यवस्था केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात येणारे नवीन तंत्रज्ञान समजण्यासाठी ई- लर्निंग ची उत्तम व्यवस्था केली आहे.
ऑटोमोबाईल गॅरेज किंवा वर्कशॉप सुरू करताना त्यासाठी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी चे ज्ञानही आवश्यक असते यासाठी लेथ मशीन, ग्राइंडर, ड्रिलिंग मशीन, वेल्डिंग मशीन, थ्रेडिंग साठी टॅप व डाय सेट, चॉप-सॉ अशी यंत्रे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कॉम्प्रेसर, कार वॉशिंग मशीन, टायर प्रेशर गेज, बॅटरी टेस्टिंग व चार्जिंग मशीन, स्पार्कप्लग टेस्टर आणि क्लिनर, इंजेक्टर टेस्टर सर्व प्रकारचे स्पॅनर व हॅन्ड टूल्स यांची देखील उपलब्धता आहे.