इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी प्रयोगशाळा

     उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विषयासाठीची प्रयोगशाळा ही सुमारे एक हजार स्क्वेअर फूट एव्हडी आहे. यामध्ये अकरावी व बारावी मधील एकूण ४० मुलांची बसण्याची व प्रात्यक्षिक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रयोगशाळेमध्ये इलेक्ट्रॉनिक विषयांमधील विविध तक्ते, पोस्टर्स, अद्यावत माहिती देणारे फलक लावलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी प्रात्यक्षिक या विषया संदर्भातील विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स मॉडेल्स, उपकरणे, मोजमापन उपकरणे तसेच आवश्यक हत्यारे व विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सुटे भाग प्रात्यक्षिक विषय शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन, डिश टीव्ही इ.साहित्य व उपकरणे यांची जोडणी व दुरुस्ती साठी उपलब्ध आहेत. यामध्ये शिकविताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एलसीडी प्रोजेक्टर, लॅपटॉपचा वापर केला जातो.यासाठी आवश्यक असणारे लाऊड स्पिकर, साऊंड सिस्टिम उपलब्ध आहे.