उद्योगश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील

ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स ॲंड कॉमर्स

कॉमर्स विभाग 

आपल्या संस्थेमध्ये कॉमर्स विभागाची सुरूवात १९७८ साली शासकिय मान्यता मिळून झाली. इयत्ता अकरावी कॉमर्सची पहिली बॅच १९७८-७९ सालामध्ये सुरू झाली असून आतापर्यंत एकूण ४३ बॅच पूर्ण झालेल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी कॉमर्स मधील बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन विविध शासकिय, निमशासकिय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत..

सुरुवातिच्या कालावधीत आद. कै. विश्वनाथ थुमके सर आणि श्री महादेव भुजबले सर यांनी कॉमर्स विभागाची धुरा समर्थपणे सांभाळली.

कॉमर्स विभागामध्ये इयत्ता अकरावी व बारावी साठी  शिकविले जाणारे कॉमर्स विभागाचे विषय

  • मराठी
  • इंग्लिश
  • बुक किपिंग एंड अकाउंटन्सी
  • सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
  • ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स
  • अर्थशास्त्र

सध्या श्री अजय गुरसाळे सर, श्री प्रीतम धुरत सर आणि की. श्रुती जांभेकर मॅडम हे विषय शिकवितात.आत्ता चालू वर्षी सन 2021-22 मध्ये एकूण 120 विद्यार्थी कॉमर्स विभागांमध्ये शिक्षण घेत आहेत.

कॉमर्स विभागांचे सर्व विषय शिकवित असताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि ई-लर्निंगचा वापर केला जातो. त्यामध्ये पावर पॉइंट प्रेझेंटेशन, युट्युब चॅनेल, पीडीएफ स्वरूपातील नोट्स, ऑनलाइन गाईडन्स, ऑनलाइन झूम क्लासरूम, क्लास ग्रुप आणि सोशल मीडिया, स्लाईड प्रोजेक्शन या नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो त्याचबरोबर शेअर मार्केट डेटा कलेक्शन, शेअर मार्केट एज्युकेशन, ऑनलाइन गाईडन्स,  म्युच्युअल फंड आणि सिक्युरिटी मार्केट यांचे महत्त्व हे या विषयांतर्गत व्यवहारातील ज्ञान मुलांना दिले जात आहे.

 

विषय

इयत्ता अकरावी

  • मराठी
  • इंग्लिश
  • बुक किपिंग एंड अकाउंटन्सी
  • सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
  • ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स
  • अर्थशास्त्र
  • पर्यावरण
  • आरोग्य व शारीरिक शिक्षण

इयत्ता बारावी

  • मराठी
  • इंग्लिश
  • बुक किपिंग एंड अकाउंटन्सी
  • सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
  • ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स
  • अर्थशास्त्र
  • पर्यावरण
  • आरोग्य व शारीरिक शिक्षण