उद्योगश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील

ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स ॲंड कॉमर्स

आर्टस विभाग

आपल्या संस्थेमध्ये आर्ट्स विभागाला १९८० साली शासनाची मान्यता मिळून आर्टस विभाग सुरू झाला. आर्ट्स विभागाची पहिली बॅच शैक्षणिक वर्ष १९८०-८१ साली सुरू झाली. आत्तापर्यंत आपल्या संस्थेमधून आर्ट्स विभागा मधून ४३ बॅचेस ज्ञानार्जन करून बाहेर पडल्या आणि आत्तापर्यंत सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी या आर्टस् विभागांमधून शिक्षण घेऊन विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहेत. आर्ट्स विभागामध्ये सुरवातीच्या कालावधीत कै.मोहन चोपडे सर, श्री शरद काळे सर, कै. विलास चिले सर, कै. मनोहर शंकरदास सर, श्री माईणकर सर, श्री भडळे सर, श्री. महादेव भुजबळे सर, श्री मन्सूर नदाफ सर, के. दिलीप मंत्री सर,श्री.आत्माराम कांबळे सर या प्रतिभावंत और विद्वत्तापूर्ण शिक्षकांचे योगदान लाभलेले आहे.

तसेच सध्या या विभागांमध्ये श्री. संजय सानप सर, श्री संगप्पा गुरव सर श्री. सचिन शेटे सर, श्री भोर सर, श्री. भोलेनाथ कानगल सर व श्री नितीन वरूणकर सर, श्री. राणे सर, श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्रीमती आरती मांगले मॅडम हे शिक्षक कार्यरत आहेत. चालू वर्षी शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये आर्ट्स विभागांमध्ये एकूण ११०  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कॉमर्स विभागामध्ये इयत्ता अकरावी व बारावी साठी  शिकविले जाणारे कॉमर्स विभागाचे विषय

  • मराठी
  • इंग्लिश
  • अर्थशास्त्र
  • राज्यशास्त्र
  • इतिहास
  • भूगोल

ह्या विभागातील कुमार शशांक काडगे हा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील इयत्ता बारावी चा विद्यार्थी बोर्ड परीक्षेत भूगोल विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवत उत्तीर्ण झाला व कोकण बोर्डमध्ये भूगोल विषयामध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. हे आपल्या संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.

आर्ट्स विभागातील सर्व विषयांचे अध्यापन हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून केले जात आहे. यासाठी पावर पॉइंट प्रेझेंटेशन, गुगल मीट, गूगल क्लासरू, यूट्यूब व्हिडिओज आणि प्रोजेक्टर अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून केले जात आहे त्याचप्रमाणे विभागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात आणि वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा केले जात आहे.

विषय

इयत्ता अकरावी

  • मराठी
  • इंग्लिश
  • अर्थशास्त्र
  • राज्यशास्त्र
  • इतिहास
  • भूगोल
  • पर्यावरण
  • आरोग्य व शारीरिक शिक्षण

इयत्ता बारावी

  • मराठी
  • इंग्लिश
  • अर्थशास्त्र
  • राज्यशास्त्र
  • इतिहास
  • भूगोल
  • पर्यावरण
  • आरोग्य व शारीरिक शिक्षण