स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर जीवनपट
स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांचा जन्म २० जानेवारी १९२४ रोजी देवरूख- रत्नागिरी येथील हरपुडे गावी झाला. प्राथमिक शिक्षण १९३९ साली इयत्ता सातवी परीक्षा पास झाले. नोव्हेंबर १९३९ ते डिसेंबर १९४० कालावधीत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्य संग्रामात उडी…डिसेंबर १९४१ भागलपूरच्या सत्याग्रहात सामील झाले …. बिहारच्या भागलपूर भागातून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला आणि लाठीमार झेलून झेंडा फडकावला…..अटक व भागलपूर तुरुंगातुन सुटका…४ जानेवारी १९४२ भारत संरक्षण कायद्याखाली अटक (देवरुख कोठडी)…..१८ ऑक्टोबर रत्नागिरी जेल …१९ ऑक्टोबर १९४० मुंबईत प्रथम पदार्पण….पंधरा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाल्यावर ती भोगण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील हिंडलग्याच्या मध्यवर्ती तुरुंगात पाठविण्यात आले….१३ ऑक्टोबर १९४३ रोजी सुरू झालेला एकांतवास अशा तऱ्हेने एकशे अकरा दिवसानी संपला होता.…रत्नागिरीच्या तुरुंगातून फरारी झाल्याने १९-१-४४ रोजी झालेली सक्तमजुरीची १ वर्ष तीन महिन्यांची शिक्षा १८ एप्रिल १९४५ ला संपावयाची होती….१९४४-४५ शैक्षणिक वर्षात प्री-मॅट्रिकचा अभ्यास पूर्ण करून ती परीक्षा पास झाले…डिसेंबर १९४४ व मे १९४५ देवरुख येथे शाखानायक शिबिरे घेतली…..१९४५ साली दिवाळीच्या सुट्टीत देवरुख जवळील अंगिवली या गावी सेवादल शिबीर घेतले.….१९४१ ते ४७ देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोन वेळा जीव धोक्यात घातला होता….. दोन वर्षे कारावास भोगला होता.….ही ऐन उमेदीची सहा वर्षे देशार्पण केली होती…..१९४१ ते १९४७ या कालावधीत बिहारच्या भागलपूर भागातून स्वातंत्यलध्यात सहभाग घेतला आणि लाठीमार झेलून झेंडा फडकावला…बेचाळीसचा चलेजाव संग्राम ….स्थानबद्ध, तुरुंग फोडून फरारी व भूमिगत ….पुन्हा अटक व सक्त मजुरी……भागलपूर, रत्नागिरी, वरळी, हिंडलगा, विसापूर जेलमध्ये तुरुंगवास.…आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस हा १५ ऑगस्ट १९४७ असे नमूद केले…..जून १९४७ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये इंटर आर्टसला मध्ये प्रवेश घेतला…..त्यांनी विद्यापिठातून बी.ए. (ऑनर्स) शिक्षण पूर्ण केले……१९५० मध्ये वयाच्या सव्विसाव्या वर्षी बी. ए. (ऑनर्स) ही पदवी परीक्षा पास…..१९५० साली पदवी परीक्षा दिली तेव्हा मुंबई किंवा पुणे विद्यापीठाची पदवी मिळविण्याचा पर्याय उपलब्ध…२१ जुलै १९५० रोजी लग्न नोंदणी पद्धतीने रजिस्ट्रार यांचे ऑफिसात फोर्ट (मुंबई) येथे झाले …..२८ मे १९५१ रोजी कन्या जन्म झाला…. साप्ताहिक बैठका, मासिक सहली, प्रासंगिक चर्चासत्रे, सामाजिक पाहाण्या, इत्यादी उपक्रम करून युवकांना संघटित करावयाचा प्रयत्न होता…..१९५० साली भारत हे प्रजासत्ताक घोषित झाल्यावर आपला खारीचा वाटा उचलण्याचा हा स्वयंस्फूर्त प्रयत्न होता……स्वातंत्र्योत्तर काळात १९५१ अखेरपर्यंत राजकिय काम……१९५१ अखेर राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला…..३१-५-५४ रोजी खारेपाटणमध्ये प्रवेश……राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विकासकार्य, शिक्षणातून ग्रामविकासासाठी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, तंत्र अभ्यासक्रमाची उभारणी……ध्येयनिश्चिती….“शिक्षणातून पुनर्रचना, पुनर्रचनतून शिक्षण…… मार्च १९५५ अखेर शिक्षण प्रसारावरील विश्वास द्विगुणित होत असताना बी.टी. होऊन खारेपाटणला परतले…..’खेड्यांकडे चला’ चे स्फूर्तिदायक प्रात्यक्षिक ग्रामीण मुला-मुलींचे शैक्षणिक प्रश्न कसे सोडवावे याचे अनुभवसिद्ध उदाहरण……मे १९६१ मध्ये मुंबई येथे शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय’ नामकरण समारंभ साजरा केला…… १४-५-६१ रोजी राज्यमंत्री निर्मलाराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली बॉम्बे सेंट्रल येथील मराठा मंदिरात शानदार समारंभ आयोजित करून खारेपाटण प्रशाळेला अरविंदभाईंच्या वडिलांचे नाव शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय हे नांव दिले गेले…..विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून श्री. पेंढारकरसर यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य विचारात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्यांना १९६७-६८ साली जिल्हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला…..१९७२ पासून इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग हायस्कूलला जोडले गेले……जून १९७६ पासून बारावी सायन्स वर्गाला मान्यता मिळाली व तिसऱ्या वर्षी म्हणजे जून १९७७ पासून १२ वी कॉमर्सचा वर्ग सुरू झाला….. त्यात आणखी पाच सहा वर्षांनी ११ वी १२ वी आर्टस् (Composit) ची भर पडून खारेपाटण येथे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स व आर्टस् स्थापन करण्यात सरांना यश मिळाले….. शिक्षक व विद्यार्थ्यांची नेतृत्व प्रशिक्षण शिबिरे घेऊन जिल्ह्यातील ४५ शाळांत “युवक विकास केंद्रे स्थापण्याचा प्रयत्न केला…. १६ मार्च १९७८ रोजी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण आणि खारेपाटण शाळेचा व संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा झाला तेव्हा खारेपाटण येथील मुख्य काम संपले असे गुरूवर्यानी जाहीर केले…. १९८२ मध्ये शालेय सेवेतून निवृत्त….. जानेवारी १९८३ मध्ये त्यांच्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन खारेपाटण येथे थाटामाटात भरवले गेले…. जून १९८९ पासून ज्युनिअर कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो इंजिनिअरिंग व ऑडिटिंग-अकौंटिंग या तीन टेक्नो-व्होकेशनल कोर्सिसची जोड देण्यात यश प्राप्त…. त्यानिमित्ताने खारेपाटण सारख्या खेड्यात पहिला कॉम्प्युटर आणला……खारेपाटण शिक्षण संकुलाचे मानद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून साडे नऊ वर्षे जबाबदारी पार पडली…..डिसेंबर १९९१ अखेर पर्यंत कार्यरत.…शिक्षण व विकास विषयक कामे मार्गी लागली …. आपल्या देशात नव्याने सुरू झालेल्या विकास युगात ग्रामीण शिक्षण प्रसाराद्वारे ‘स्वराज्याचे सुराज्य’ करण्याचे नवे ध्येय त्यांना गवसले आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी १९५२ ते १९९१ पर्यंत केला….२० डिसेंबर १९४१ रोजी सार्वजनिक कार्यात पदार्पण केले होते त्याला २० डिसेंबर १९९१ रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने सरांनी मुक्काम खारेपाटणहून पुण्याला हलविला….१९९२ साली आत्मकथा लेखन व आत्मचरित्र प्रसिध्द….देहावसान ३० डिसेंबर २००९.
श्री.शंकरराव पेंढारकर सर कविता
श्री.शंकरराव पेंढारकर सर आत्मचरित्र

