Skip to content
KPSPM
  • Home
  • आमच्याविषयी
    • अत्यावश्यक माहिती
    • इतिहास
  • शैक्षणिक
    • शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय प्राथमिक विभाग
    • शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय माध्यमिक विभाग
    • उद्योगश्री प्रभाकर लक्षण पाटील ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स,आर्ट्स ॲंन्ड कॉमर्स
      • विज्ञान विभाग
        • Department of Mathematics
      • आर्ट्स विभाग
      • कॉमर्स विभाग
    • तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
    • कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण
  • देणगी
    • प्रकल्प
    • इमारत
    • इव्हेंट
  • माजी विद्यार्थी
  • प्रसिद्धी
  • अचिव्हमेंट्स
  • संपर्क
  • Toggle website search
Menu Close
  • Home
  • आमच्याविषयी
    • अत्यावश्यक माहिती
    • इतिहास
  • शैक्षणिक
    • शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय प्राथमिक विभाग
    • शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय माध्यमिक विभाग
    • उद्योगश्री प्रभाकर लक्षण पाटील ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स,आर्ट्स ॲंन्ड कॉमर्स
      • विज्ञान विभाग
        • Department of Mathematics
      • आर्ट्स विभाग
      • कॉमर्स विभाग
    • तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
    • कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण
  • देणगी
    • प्रकल्प
    • इमारत
    • इव्हेंट
  • माजी विद्यार्थी
  • प्रसिद्धी
  • अचिव्हमेंट्स
  • संपर्क
  • Toggle website search

तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम

  1. Home>
  2. तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
आमच्याविषयी
अचिव्हमेंट
उपक्रम
वर्ग
परीक्षा
प्रवेश प्रकिया
निकाल
स्टाफ
कार्यक्रम
गॅलरी
आमच्याविषयी

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
कै. तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन

       आपल्या महाराष्ट्र राज्यात ४२ वर्षापूर्वी १०+२+३ पॅटर्न सुरु झाला. नव्याने सुरु झालेल्या शैक्षणिक धोरणात तंत्रज्ञान व औद्योगिक शिक्षणावर भर दिला जाऊ लागला. नव्या तंत्रज्ञानाभिमुख शैक्षणिक धोरणाचे सक्रीय स्वागत करण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने व्यवसाय शिक्षणाची सोय करण्याचे ठरविले. सन १९८८ साली केंद्रशासन पुरस्क्रूत किमान कौशल्याधारीत +२ स्तर व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजेच इयत्ता ११वी व १२वी या वर्गाना अनुदान तत्वावर मान्यता मिळाली. त्यानंतर १९८९ पासून ऑटोमोबाईल ईंजिनिअरिंग टेक्निशियन कोर्स, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हे इंजिनियरिंग व टेक्नॉलॉजी विभागातील व आणि अकौटन्सी ॲंड ऑडीटींग हे कॉमर्स विभागातील तांत्रिक विषयाचे वर्ग नियमित सुरू झाले. सुरवातीला प्रत्येक अभ्यासक्रमसाठी वीस विद्यार्थी संख्या निर्धारीत करण्यात आली होती. सध्या वाढीव विद्यार्थी संख्या मान्यते नुसार २०+५+५ अशी ३० प्रत्येक अभ्यासक्रमसाठी विद्यार्थी संख्या निर्धारीत करण्यात आलेली आहे.
         प्रथितयश व्यावसायिक आदरणिय श्री. किशोर्जी मुसळे यांच्या श्री. किशोर मुसळे चॅरीटेबल ट्रस्ट यांच्याआर्थिक सहकार्यातून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाची पहिल्या मजल्याची इमारत बांधून पुर्ण झाली. सदर तांत्रिक शिक्षण विभागाला त्यांचे वडिल कै. तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन असे नामकरण करण्यात आले. सध्याचे या विभागाचे नांव उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, कै. तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन असे असून नवीन अभ्यासक्रम बदलानुसार
   1) ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी,
   2) इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी
   3) अकौटन्सी ॲंड ऑफिस  ऑटोमेशन
हे अभ्याससक्रम शिकविले जातात. 

अचिव्हमेंट

उपक्रम

 

  • ऑन दी जॉब ट्रेनिंग

              ऑन दी जॉब ट्रेनिंग या कार्यक्रमा अंतर्गत इयत्ता अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक कामाचा अनुभव मिळावा या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी कमीत कमी एकवीस दिवसांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षण कार्यक्रम (ऑन दी जॉब ट्रेनिंग) आयोजित केला जातो. या कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालय परिसरातील व्यवसाय, दुरूस्ती व देखभाल सेंटर, सेवा केंद्र, सुटे भाग विक्री व सेवा केंद्र तसेच विविध आस्थापना यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणासाठी योजना तयार करून पाठ्विले जाते. या माध्यमातून शिकविलेला तंत्रविषय सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचे प्रत्यक्षात उपयोजन व माहीती मिळते. व्यवसायामध्ये व आस्थापना मध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यार्थी घेतात. प्रात्यक्षिक विषयामध्ये शिकविलेल्या कौशल्यांचे उपयोजन व सराव व्यवहारात करण्याची तंत्र अवगत होते. नवनवीन तंत्रज्ञान व उत्पादने त्यांचे सुटे भाग, जोडणी व तपासणी यांचे प्रत्यक्ष ज्ञान या प्रशिक्षणामधून विद्यार्थ्यांना मिळते.

  • प्रॉडक्शन ओरीएंटेड ट्रेनिंग

                प्रॉडक्शन ओरीएंटेड ट्रेनिंग (उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना) हा एक व्यवसाय अभ्यासक्रमाचा   भाग असून विद्यार्थ्यांनी आपले बारावीचे शिक्षण सुरू असतानाच शिकलेल्या कौशल्याचा वापर करून संबंधित विषय शिक्षकांच्या व व्यवसाय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपकरणांची दुरुस्ती व देखभाल यासारखी कामे स्वतः घेऊन ती पूर्ण करावयाची असून त्यामधून आर्थिक मोबदला विद्यार्थ्यास मिळेल या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमामधून प्रशिक्षण घेऊन काम केल्यावर विद्यार्थ्यास आर्थिक स्वयंपूर्णता मिळू शकते असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. 

  • औद्योगिक भेटी

              औद्योगिक भेटी या कार्यक्रमा अंतर्गत इयत्ता अकरावी व बारावी या दोन्ही शैक्षणिक वर्षमध्ये विविध अभियांत्रिकी आस्थापना, कारखाने, आकाशवाणी,अभियांत्रिकी व तंत्र्ज्ञान केंद्रे व विविव्ध  प्रक्षेपण केंद्र तसेच विविध  दुरुस्ती व सेवा केंद्र इत्यादि ठिकाणी भेटी देऊन तेथिल कामांचे प्रत्यक्ष अनुभव व माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे व्यवहारातील उपायोजन व नवनविन तंत्रज्ञान व त्यांची उपयोजिता याचे ज्ञान मिळते. 

  • प्रकल्प

              या कार्यक्रमा अंतर्गत इयत्ता अकरावी व बारावी अभ्यासक्रम सुरू असताना विद्यार्थ्यांकडून चल प्रकल्प तयार करण्याविषयीचे मार्गदर्शन दिले जाते व प्रकल्प तयार करून घेतले जातात. तसेच त्या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे सुद्धा प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांनी तयार करावयाचे चल प्रकल्प हे ते शिकत असलेल्या विषयावर आधरित असल्याने विद्यार्थ्यांच्या त्य विषयाचे चांगले आकलन होते व ते त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देणारे ठरतात.

  • अतिथी व्याख्याते

                इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे देखभाल व दुरुस्ती विषयातील अद्यावत व सखोल मार्गदर्शन मिळण्याच्या द्रुष्टिने या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व प्रतिथयश व्यावसायिक यांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. त्याच प्रमाणे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे भांडवल, प्रकल्प अहवाल यासबंधीचेमार्गदर्शन करणरे बॅंक, आर्थिक सहाय्य करणार्या संस्थांचे अधिकारी व सनदी लेखाकार असे तज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्यासाठी आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर, प्रेरेक वक्ते याची व्याख्याने आयोजित केली जातात. जेणेकरून विद्यार्थ्याचे सक्षम व्यक्तिमत्त्व तयार होईल.

वर्ग
ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी

ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी

अधिक पहा
अकौटिंग ॲंड ऑफिस मॅनेजमेंट

अकौटिंग ॲंड ऑफिस मॅनेजमेंट

अधिक पहा
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी

अधिक पहा
परीक्षा
  • प्रथम घटक चाचणी
  •  सहामाही परीक्षा
  •  द्वितीय घटक चाचणी/ पूर्व परीक्षा
  •  वार्षिक परीक्षा
प्रवेश प्रकिया

प्रवेश पात्रता

  • दहावी इयत्तेत उत्तीर्ण

 प्रवेश अर्ज

निकाल
Tab Content
स्टाफ
श्री. महेंद्र गंगाधर चिंगळे

 श्री. महेंद्र गंगाधर चिंगळे

 डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स,टेलिकॉम इंजि.
सहाय्यक शिक्षक

श्री. सतीश अंकुश नाईक

श्री. सतीश अंकुश नाईक

शिक्षण : डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स,टेलिकॉम इंजि.बी.ए.बी.टेक.
पदनाम : सहायक शिक्षक

श्री. दयानंद बंडू कोकाटे

नाव : श्री. दयानंद बंडू कोकाटे

 डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजी.
सहाय्यक शिक्षक

श्री. सुबोध विजय देसाई

 श्री. सुबोध विजय देसाई

 बी.इ. (ऑटोमोबाईल इंजी.)
सहाय्यक शिक्षक

कार्यक्रम

 १. गुरुवर्य स्वातंत्रसैनिक वीर शंकरराव पेंढारकर यांची जयंती 

२. प्रजासत्ताक दिन

३. शैक्षणिक सहली

४. स्वच्छता मोहीम

५. व्यवसाय शिक्षण प्रचार व प्रसार

६. वùक्षारोपण

७. स्वातंत्र्यदिन 

८. अभियंता दिन

९. सरस्वती पूजन

१०. वार्षिक क्रीडा स्पर्धा 

११. स्नेहसंमेलन

१२. गुरुवर्य स्वातंत्र्यसैनिक वीर शंकरराव पेंढारकर यांची पुण्यतिथी

 

गॅलरी
Tab Content

Social Media quick access:

          • YouTube
          • Facebook