
नवीन अभ्यासक्रमातील दहावीची परीक्षा १९७५ साली झाली आणि १९७५-७६ ला कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखा प्रथम सुरू करण्यात आली. १९७६-७७ ला वाणिज्य विषयाची शाखा लगेचच दुसऱ्या वर्षी सुरू केली. सुरुवातीला विज्ञान शाखा व वाणिज्य शाखांना वर्ग चालण्याएवढी म्हणजे ४५ ते ५० एवढी विद्यार्थी संख्या होती. परंतु मध्येच एक- दोन वर्षे विज्ञान शाखेची विद्यार्थी संख्या २५ पर्यंत खाली आली. आणि त्यामुळे एक वर्गाची मान्यता कायम असली तरी वेतन अनुदानात कपात केल्यामुळे संस्थेला दोन वर्षे दोन विज्ञान शिक्षकांचा पूर्ण पगार यावा लागला. हा संस्थेने वेतन कपात न करता पूर्ण पगार शिक्षकांना अदा केला. त्यानंतर प्रयत्न, प्रचार व जागृती यामुळे १९८० पासून कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांना समाधानकारक संख्य उपलब्ध होत गेली. सारख्या उपलब्ध होत गेली.
१९८४ ला वाणिज्य शाखेच्या जोडीला कला शाखा जोडून कला वाणिज्य अशी संयुक्त तुकडी सुरु करण्यात आली. त्यावेळी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी पण कला शाखेसाठी जेमतेम म्हणजे वीस एवढीच विद्यार्थी संख्या होती. अशी स्थिती १९९० पर्यंत कायम होती. त्यानंतर कला-वाणिज्य संयुक्त तुकडीची एका वर्गातील विद्यार्थी संख्या १०० एवढी झाली होती. त्यावेळी विद्यार्थी वर्गाचा कला शाखेकडे ओढा अधिक झाला होता. तर वाणिज्य शाखेचे आकर्षण कमी कमी होत चालले होते.
हे सर्व विद्यार्थी संख्येतील बदलत घडत असताना कनिष्ठ महाविद्यालयासाठी हायस्कूलची इमारत तेवढीच उपलब्ध होती. त्यामुळे कला वाणिज्य शाखेचे वर्ग शिफ्ट पद्धतीने भरविले जात असत. वशिष्ट पद्धतीने सकाळी भरत असत. त्याच्या जोडीला काही हायस्कूलचे वर्गही भरवले जात असत. जागा पुरेशी नव्हती. त्यात इंग्रजी व मराठी माध्यम वाणिज्य विषयासाठी ठेवले होते. वर्गखोल्या नसल्यामुळे जुन्या इमारतीच्या व्हरांड्यात, प्रसंगी आमराईत व आंब्याच्या झाडाखालीही अध्यापन होत असे.
१९८३ ते ८७ च्या काळातही अशीच स्थिती होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही वाणिज्य शाखेचा निकाल ८०% होता. तर विषयवार निकाल ९५% से १००% या दरम्यान होते हे विशेष उल्लेखनीय.
सध्या ज्युनियर कॉलेज विद्यार्थी संख्या इयत्ता अकरावी व बारावी मिळून ४०० पेक्षा जास्त असून स्वतंत्र इमारत ज्युनिअर कॉलेजसाठी उपलब्ध आहे. उद्योगश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील यांच्या उदार देणगीतून ज्युनियर कॉलेज च्या नवीन इमारतीचे बांधकाम व नूतनीकरण करण्यात येऊन आपल्या ज्युनियर कॉलेजच्या इमारतीस उद्योगश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील, ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स,आर्ट्स ॲंड कॉमर्स असे नामकरण १९९९ साली करण्यात आले.
शिक्षक दिन
पर्यावरण सेवा योजना प्रकल्प अंतर्गत
- सरस्वती पूजन
- जैवविविधता संवर्धन
- बीज संकलन
- पक्षी निरीक्षण
- वनराई बंधारा
- देवराई सर्वेक्षण
- टाकावू पासून टिकवू – कापडी पिशव्या
- जलव्यवस्थापन
- फुलपाखरू उद्यान
- रोपवाटीका
- स्वच्छ वाडी, सुंदर गाव
- खारेपाटण गाव सर्वेक्षण
- पर्जन्य नोंद
क्रिडा विभाग
1) सांघिक मैदानी खेळ मुलांसाठी
- कबड्डी
- खोखो
- व्हॉलीबॉल
- फुटबॉल
2) सांघिक मुलीसाठी
- कबड्डी
- खोखो
- व्हॉलीबॉल
- फुटबॉल
- बॅडमिंटन
3) वैयक्तीक खेळ
- धावणे १००, २००,४००,८००,१५००,३०००
- Marathon
- ३-५ किमी
- हर्डलस १००
- रीले १००*४, ४००”४
- लांब उडी
- उंच उडी
- थाळी फेक
- गोळा फेक
- हेमर थ्रो
- भाला फेक
4) बैठे खेळ
- कॅरम
- बुद्धिबळ
5) वाड्मय मंडळ – मराठी विभाग
- कथाकथन
- कथालेखन
- काव्यलेखन
- निबंध स्पर्धा
- हस्ताक्ष्रर स्पर्धा
- वक्त्रूत्व स्पर्धा
- प्रथम घटक चाचणी
- सहामाही परीक्षा
- द्वितीय घटक चाचणी/ पूर्व परीक्षा
- वार्षिक परीक्षा