
विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होण्यासाठी पेंढारकर सरांनी खारेपाटण येथे बालोद्यान व शिशुविहाराची स्थापना केली. त्यानंतर बरीच वर्षे बालोद्यान खारेपाटण बाजारपेठेमधील एका इमारतीमध्ये सुरू होते. परंतु मागील काही वर्षात खारेपाटण हायस्कूलच्या आवारामध्ये शिशुविहार सुरू करण्यात आले.
प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होण्यासाठी प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांना दर्जेदार मिळावे. या तळमळीने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै. पुरुषोत्तमजी धुमाळे व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक यांनी स्वयंअर्थसहाय्यित पद्धतीने पहिली ते चौथीचे प्राथमिक वर्ग २०१७-१८ या सालापासून सुरू केले..२०१७-१८ या सालामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये फक्त सात विद्यार्थी होते. त्या सात विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा सुरू झाली. परंतु मागील चार वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कित्येक शाळा विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडत आहेत अशा परिस्थितीमध्ये खारेपाटण हायस्कूलचा हा प्राथमिक विभाग जोमाने बहरत चालला आहे .विद्यार्थी संख्या सात वरून एकाहत्तरवर पोचली आहे. हे या शाळेच्या प्रगतीचं लक्षण आहे.
खारेपाटण पंचक्रोशी विभागातील अनेक गावातील विद्यार्थी आज या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत .येथे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेचे जादा मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्ही द्वारे डिजिटल स्वरूपाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यामुळे ही शाळा अल्पावधीतच पंचक्रोशीमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
प्रवेश पात्रता
नर्सरी : वयाची तीन वर्षे पूर्ण
ज्युनियर : वयाची चार वर्षे पूर्ण
पहिली : वयाची सहा वर्षे पूर्ण
आवश्यक कागद्पत्रे
जन्म दाखला (मूळ प्रत)
दोन पासपोर्ट साईझ फोटो
शिष्यवृत्ती
मॅट्रिकपूर्व भारत सरकार शिष्यवृत्ती
छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
गुणवत्ता शिष्यवृत्ती
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- वार्षिक क्रीडा स्पर्धा
- स्नेहसंमेलन
- वक्तृत्व स्पर्धा
- रांगोळी स्पर्धा
- निबंध स्पर्धा
- चित्रकला स्पर्धा
- वेशभूषा स्पर्धा
- सांस्कùतिक कार्यक्रम
- शैक्षणिक सहली
- कागदापासून शोभेच्या वस्तू बनविणे
- प्रथम घटक चाचणी
- सहामाही परीक्षा
- द्वितीय घटक चाचणी/ पूर्व परीक्षा
- वार्षिक परीक्षा
कार्यक्रम
- गुरुवर्य स्वातंत्रसैनिक वीर शंकरराव पेंढारकर यांची जयंती
- प्रजासत्ताक दिन
- बक्षिस समारंभ
- गुढीपाडवा
- स्वागत समारंभ
- स्वातंत्र्यदिन
- दहीहंडी दहिकाला
- ईद
- सरस्वती पूजन
- दिवाळी
- स्नेहसंमेलन
- गुरुवर्य स्वातंत्र्यसैनिक वीर शंकरराव पेंढारकर यांची पुण्यतिथी