
१९८९ साली नवीन व्यवसाय अभ्यासक्रम + २ स्तरावर सुरू झाले. त्यापासून नवीन असे अभ्यासक्रम संस्थेने हाती घेतले नव्हते. आपल्या संस्थेमध्ये थेट पदवी पर्यंतचे शिक्षण भविष्यात घेता यावयास हवे अशी इच्छा गुरुवर्यानी बोलून दाखविली होती. त्याप्रकारचे प्रयत्नही सतत मंडळामार्फत सुरू होते. यासाठी मुंबई विद्यापिठ व शिवाजी विद्यापिठांना भेटी व पत्रव्यवहारही सुरू होते.
त्यासाठी २०१०-११ यावर्षी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवून त्या प्रस्तावाची पूर्तताही करण्यात आली होती. पण काही कारणास्तव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयानी सर्व राज्यातील त्यावर्षीचे प्रस्ताव रद्द केले होते. त्यामुळे त्यावर्षी महाविद्यालय सुरु करता आले नाही. २०११-२०१२ यावर्षी मुंबई विद्यापीठाने पुन्हा प्रस्ताव मागविले त्यानुसार संस्थेने प्रस्ताव सादर केला व कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय सुरु करावयाचे असा चंग बांधला.
पुढे ३ जुलै २०१२ रोजी खारेपाटण संस्थेच्या कला, वाणिज्य महाविद्यालयाला शासन व विद्यापीठाने परवानगी दिली आणि संस्थेच्या प्रांगणात एक नवीन पदवी अभ्यासक्रमाची सुरूवात झाली. याकामी श्री उद्योगमंत्री ना. नारायणराव राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून आम्ही यशस्वी झालो. कला व वाणिज्य महाविद्यालय सुरु सुरु झाले. पण त्यामध्ये विज्ञान शाखा अजून बाकी होती.
विज्ञान शाखेची पूर्तता करण्यासाठी संस्थेने परत प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवून कागदपत्रांची पूर्तता केली. आणि २०१९ पासून कला वाणिज्य सोबतच विज्ञान शाखाही सुरू करण्यात आली. त्याबरोबर आय. टी. व संगीत विषयाची स्वतांत्र व्यवस्था करण्याचा मानस आहे.
महाविद्यालयासाठीची स्वतंत्र इमारत व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार केलेला असून त्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. येत्या पाच वर्षात हे इमारतीचे काम पूर्ण करण्याचा संकल्प आहे.
या सर्व कामांची पूर्तता करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, पुढील काळात संस्थेला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्याची संकल्पना आहे. यासाठी संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक आजी-माजी विद्यार्थी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी संस्थेला वेळोवेळी सहकार्य केले आहे.