पूर्वेतिहास
खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर व कोकण रेल्वेपासून ४ कि. मी. अंतरावरील सुखनदी काठचे निसर्गरम्य गांव आहे. उत्तरेस रत्नागिरी व दक्षिणेस सिंधुदुर्ग नगरी ही जिल्हा ठिकाणे अनुक्रमे ९० व ६० कि. मी. अंतरावर आहेत. कणकवली तालुक्यातील या गावाला राजापूर, देवगड व वैभववाडी या तालुक्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत. विजयदुर्ग पासून भुईबावड्या पासूनची व कोंडये पासून फोंड्या पर्यंतची १०० गांवे हे आमची कार्यक्षेत्र आहे.
स्थापना:
खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या सुमुहुर्तावर दि. १६ मार्च १९५३ रोजी खारेपाटण येथे झाली. या नवोदित संस्थेचे अध्यक्षपद गावात त्यावेळी नुकतेच स्थायिक झालेले डॉ. डी. एल. सोमण यांनी स्वीकारले. येथील विधायक कार्यकर्ते डॉ. एस. आर. गुणीजन उपाध्यक्ष झाले. तत्कालीन सरपंच श्री. काका शेटये यांचेही प्रोत्साहन लाभले.चिटणीस पदाची धुरा श्री. मनोहर काडगे यांनी स्वीकारली. आरंभीच्या अन्य सदस्यांमध्ये के. डॉ. र. का. राणे ए. वाय. मुकादम व सर्वश्री. कै. म. वि. फडके अ. व्यं. ढेकणे, जगन्नाथशेठ नार्वेकर, कृष्णशेठ पोरे, शंकरशेठ गाड, व श्री. न. ल. सप्रे ही स्थानिक मंडळी होती. या मंडळाने १० जून १९५३ रोजी खारेपाटणला एक खोली भाड्याने घेऊन इ. ८ वीचा वर्ग सुरु केला. या १६ मुलांच्या एक शिक्षकी वर्गाचे अध्यापन करण्याची जबाबदारी कै. बा. ना. टोळचे यांनी वर्षभर सांभाळली. तथापि ट्रेन्ड ग्रॅज्युएट शिक्षक, विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या, ड्रॉईंग हॉल, विज्ञान हॉल, वगैरेनी युक्त अशी इमारत, खेळाचे मैदान, इ. गोष्टींची पूर्तता झाल्याशिवाय या शाळेला सरकार मान्यता मिळू शकणार नाही. असे शिक्षण खात्याने मंडळाला कळविले. मंडळाने ट्रेन्ड ग्रॅज्युएट शिक्षक मिळावेत म्हणून जाहिरात दिली. पण अपेक्षेप्रमाणेच एकही अर्ज न आल्यामुळे खारेपाटण येथे इंग्रजी शाळा काढण्याचा हा सहावा प्रयत्नही निष्फळ ठरण्याचा धोका निर्माण झाला. तरीही निराश न होता मंडळाने राजापूर येथील एक हितचिंतक डॉ. पु. अ. शेट्ये यांचे सहाय्याने मंडळाने हा प्रश्न सोडविला.
शाळेचे नामांतर :
या सर्वांवर श्री. अरविंदभाई मफतलाल यांच्या देणगीने कळस चढविला गेला. त्यांनी दोन हप्त्यांनी मंडल ५० हजारची उदार देणगी दिली. पहिल्या वर्षी शाळेचे नांव “इंग्लिश स्कूल” होते. दुसऱ्या वर्षापासून ‘दुय्यम शिक्षण मंदिर’ हे नांव शाळेला प्राप्त झाले. श्री. अरविंदभाईंची देणगी मिळाल्यावर त्यांचे वडील कै. नवीनचंद्र मफतलाल यांचे नांव १४ मे १९६९ रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक देण्यात आले. २४ ऑगस्ट १९६० रोजी खारेपाटण येथील वयोवृद्ध व्यापारी कै. विनायक विष्णू देवस्थळी यांचे हस्ते नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. बांधकामाची जबाबदारी डॉ. गुणीजन यांनी अत्यंत परिश्रम पूर्वक पार पाडली भर पावसात चार तास भिजत राहून विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी ७५५५० चा स्लॅब श्रमदानाने पातला.
दुसरी पंचवार्षिक योजना पूर्ण :
एक लाखाची इमारत बांधण्याचा संकल्प जनता जनार्दनाच्या कृपेने २ लाख रुपये उभे होऊन सिद्धीस गेला. एका टप्प्यात दुमजली आलिशान वास्तू बांधून पूर्ण झाली. या इमारतीचे उद्घाटन मा. डॉ. आप्पासाहेब पवार, कुलगुरु शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे शुभहस्ते शेठ योगेंद्रभाई मफतलाल यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खारेपाटण येथे दि. २६ मार्च १९६५ रोजी मोठ्या उत्साहाने पार पाडले.
तिसरा पंचवार्षिक कालखंड :
१९६३ ते १९६८ या काळात सुमारे १० हजार खर्च करून इमारतीतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली. अनेक शिक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून शाळेसमोरील जागा अननस, केळी, फुलझाडे, लावण्यास योग्य बनविली. १९६४-६५ पासून शाळेत शारीरिक क्षमता कसोटी केंद्र सुरु झाले. जून १९६७ पासून शाळेत १०० मुलांचे छात्रसेनापथक सुरु करण्यात आले. श्री. गुरुपादगोळ यांनी एन. सी. सी. ऑफिसर म्हणून हे पथक कार्यक्षमतेने चालविले.
जिल्हा पुरस्कार
आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पेंढारकर यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य विचारात घेऊन रत्नागिरी जिल्हापरिषदेने त्यांना १९६७-६८ साली जिल्हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
शाळा समूह योजना :
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सहकार्याने १९६८-६९ पासून आमच्या विद्यालयात शाळा समूह योजना सुरु आहे. शाळेच्या परिसरातील कणकवली तालुक्यातील ६ पूर्ण प्राथमिक व ९ प्राथमिक शाळा ही योजना राबविण्यासाठी हायस्कूलला जोडण्यात आली आहेत. या १५ शाळातील शिक्षकांच्या सहकार्याने ३ ४ थी ते ७ वीच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राष्ट्रीय एकात्मता प्रकल्प :
१९६९-७९ सालापासून मध्यवर्ती सरकारच्या पुरस्काराने शाळेत राष्ट्रीय एकात्मता प्रकल्प सुरु करण्य संपूर्ण शाळा म्हणजे भारत व प्रत्येक वर्ग म्हणजे घटक राज्य अशी कल्पना करून प्रत्येक वर्गाला एका राज्याचे नांव दिले जाते. त्या राज्याची माहिती सदर वर्ग जमवितो. सौ. उषा प्रभू यांनी पहिल्या पर्वात हे खाते सांभाळले.
अल्पबचत व्यायाम शाळा :
आमच्या शाळेला अल्पबचत शाळा हे अभियान १९६२-६३ पासून प्राप्त झाले. त्यावर्षी जिल्हा अल्पबचत डाल शाळेला मिळाली. या कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनाने रु. ५ हजार व जिल्हा परिषदेने रु. ५ हजार अनुदान दिले. त्यात ५ हजाराची भर घालून २५०२४ चौ. फु. आकाराची व्यायाम शाळा शाळेला जोडून संस्थेला काढली. अल्पबचतीचे काम श्री. वेल्हाळ गुरुजी व श्री. हळदीकर गुरुजी पाहत असत.
शेठ अरविंदभाईंची भेट :
मुख्याध्यापक श्री. पेंढारकर यांच्या विनंतीला मान देऊन शेठ अरविंद भाई मफतलाल यांनी दि. २ मार्च १९६९ रोजी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संस्थेतर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले. डॉ. राणे स्मारक बालोद्यान : शाळेचे एक आधारस्तंभ कै. डॉ. र. का. राणे हे आपल्या वयाच्या ७३ व्या वर्षी ता. ८ ऑगस्ट १९६९ रोजी निधन पावले. त्यांच्या स्मृती पित्यर्थ रु. ५ हजारपेक्षा अधिक रक्कम जमा करुन शाळेच्या प्रवेशद्वारी त्यांनीच बक्षिस दिलेल्या जागेत ५० x ५० फूट मापाचे बालोद्यान सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन १९७१ मध्ये श्री. पी. के. सावंत यांचे हस्ते करण्यात आले. खारेपाटण मधील हे एकमेव बालोद्यान आहे.
सेमिनार रीडिंग पुरस्कार :
कार्यानुभवाचे व श्रमसंस्काराचे प्रयोग मुख्याध्यापक श्री. पेंढारकर यांनी खारेपाटण येथे सातत्याने चालविले होते. या अनुभवावर आधारित कार्यानुभव मधील माझे प्रयोग’ हा त्यांचा संशोधनात्मक प्रबंध एन. सी. ई. आर. टी. (दिल्ली) संस्थेने सन १९७२ सालचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी मान्य केला. हा पुरस्कार मिळविणारे श्री. पेंढारकर हे तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव मुख्याध्यापक होते. श्रमदान हा तर आमच्या संस्थेचा परवलीचा शब्द आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील विकास युगाचे प्रतीक म्हणून श्रमस्तंभ : शाळेसाठी कष्ट करण्याचे जणू स्मारक असा श्रमस्तंभ शाळेसमारे उभा केला. श्री म. वि. फडके यांनी रौप्य महोत्वाच्या मुहूर्तावर त्याचे नूतनीकरण करुन दिले.
क्रीडाक्षेत्रातील प्रगती :
शाळेला श्री. जी.बी अत्तार हे उत्साही शारीरिक शिक्षक लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील मुले खेळांच्या स्पर्धात जिल्हा व राज्य पातळीवर यश प्राप्त करु लागली. त्यादृष्टीने आमच्या शाळेच्या मुलींच्या हॉकी टीमने १९७५ मध्ये राज्य पातळीवर तिसरा क्रमांक मिळविला. १९७४ मध्ये विश्वनाथ मोरये याला राज्य क्रीडा शिष्यवृत्ती एका राज्याचे नांव दिले जाते. त्या राज्याची माहिती सदर वर्ग जमवितो. सौ. उषा प्रभू यांनी पहिल्या पर्वात हे खाते सांभाळले.
अल्पबचत व्यायाम शाळा :
आमच्या शाळेला अल्पबचत शाळा हे अभियान १९६२-६३ पासून प्राप्त झाले. त्यावर्षी जिल्हा अल्पबचत डाल शाळेला मिळाली. या कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनाने रु. ५ हजार व जिल्हा परिषदेने रु. ५ हजार अनुदान दिले. त्यात ५ हजाराची भर घालून २५०२४ चौ. फु. आकाराची व्यायाम शाळा शाळेला जोडून संस्थेला काढली. अल्पबचतीचे काम श्री. वेल्हाळ गुरुजी व श्री. हळदीकर गुरुजी पाहत असत.
शेठ अरविंदभाईंची भेट :
मुख्याध्यापक श्री. पेंढारकर यांच्या विनंतीला मान देऊन शेठ अरविंद भाई मफतलाल यांनी दि. २ मार्च १९६९ रोजी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संस्थेतर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले..
डॉ. राणे स्मारक बालोद्यान:
शाळेचे एक आधारस्तंभ कै. डॉ. र. का. राणे हे आपल्या वयाच्या ७३ व्या वर्षी ता. ८ ऑगस्ट १९६९ रोजी निधन पावले. त्यांच्या स्मृती पित्यर्थ रु. ५ हजारपेक्षा अधिक रक्कम जमा करुन शाळेच्या प्रवेशद्वारी त्यांनीच बक्षिस दिलेल्या जागेत ५० x ५० फूट मापाचे बालोद्यान सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन १९७१ मध्ये श्री. पी. के. सावंत यांचे हस्ते करण्यात आले. खारेपाटण मधील हे एकमेव बालोद्यान आहे.
सेमिनार रीडिंग पुरस्कार :
कार्यानुभवाचे व श्रमसंस्काराचे प्रयोग मुख्याध्यापक श्री. पेंढारकर यांनी खारेपाटण येथे सातत्याने चालविले होते. या अनुभवावर आधारित कार्यानुभव मधील माझे प्रयोग’ हा त्यांचा संशोधनात्मक प्रबंध एन. सी. ई. आर. टी. (दिल्ली) संस्थेने सन १९७२ सालचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी मान्य केला. हा पुरस्कार मिळविणारे श्री. पेंढारकर हे तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव मुख्याध्यापक होते. श्रमदान हा तर आमच्या संस्थेचा परवलीचा शब्द आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील विकास युगाचे प्रतीक म्हणून श्रमस्तंभ :
शाळेसाठी कष्ट करण्याचे जणू स्मारक असा श्रमस्तंभ शाळेसमारे उभा केला. श्री. म. वि. फडके यांनी रौप्य महोत्वाच्या मुहूर्तावर त्याचे नूतनीकरण करुन दिले.
क्रीडाक्षेत्रातील प्रगती :
शाळेला श्री. जी.बी अत्तार हे उत्साही शारीरिक शिक्षक लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील मुले खेळांच्या स्पर्धात जिल्हा व राज्य पातळीवर यश प्राप्त करु लागली. त्यादृष्टीने आमच्या शाळेच्या मुलींच्या हॉकी टीमने १९७५ मध्ये राज्य पातळीवर तिसरा क्रमांक मिळविला. १९७४ मध्ये विश्वनाथ मोरये याला राज्य क्रीडा शिष्यवृत्ती
पॅनेल इन्स्पेक्शन :
सन १९७१-७२ मध्ये रत्नागिरी येथील बी. एड. कॉलेजचे प्राचार्य श्री. ज. ना. दाणी यांच्या नेतृत्वाखाली १० शिक्षण तज्ञांच्या पॅनेलने शाळेची सर्वांगीण पाहणी केली व शाळा दर्जेदार असल्याची ग्वाही दिली. याच सुमारास शाळेत वीज घेण्यासाठी श्री. चंद्रकांतशेठ मसुरकर यांनी रु. २०००/- ची देणगी दिली. अशा तऱ्हेने १९५३ ते १९७३ या २० वर्षात इ. ५ वी ते ११ वी पर्यंतची ५०० मुलांची शाळा सर्व दृष्टीने सुस्थित करण्यात मंडळ यशस्वी झाले. ज्युनिअर कॉलेज स्थापना खारेपाटण येथे ग्रामस्थांच्या पाठिंब्याने ज्युनिअर कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. जून १९७५ मध्ये इ. ११ वी सायन्स व कॉमर्स ही प्रत्येकी एक तुकडी सुरु करण्यात आली. त्यासाठी ५० हजार रुपये खर्चून तीन स्वतंत्र प्रयोगशाळा व पेट्रोल गॅस प्लँट उभारण्यात आला. जून १९७६ मध्ये १२ वी सायन्सची जून १९७७ मध्ये १२ वी कॉमर्स एक-एक तुकडी सुरु करुन शाळेला जोडून ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सची स्थापना करण्यात आली. प्रारंभी हे वर्ग हायस्कूलमध्येच भरत.
वसतिगृहे :
१) श्री. आप्पासाहेब पटवर्धन वसतिगृह मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी १९५४ मध्ये हे वसतिगृह सुरु करण्यात आले. त्याला १९५६-५७ या वर्षी शासकीय मान्यता मिळाली. या वसतिगृहात त्यावेळी ३५ मुले होती. ज्युनिअर कॉलेजमुळे ही संख्या ५० च्या वर गेली. कै. मो. ज्ञा. चोपडे सरांच्या देखरेखीखाली हे वसतिगृह व्यवस्थित चालले. या वसतिगृहाला कै. श्री. बापूशेठ डोर्ले यांनी अनेक वर्षे विविध प्रकारे सहाय्य केले.
२) स्वावलंबन वसतिगृह:- १९६० साली आर्थिक मागास मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी या वसतिगृहांची स्थापना झाली. या वसतिगृहातील मुले दर आठवड्याला घराहून शिधा आणत व स्वतः हाताने जेवण करुन जेवत. संस्था त्यांना जागा, वीज, वैद्यकीय मदत या गोष्टी मोफत पुरवित असे. या वसतिगृहात २० मुले होती. त्यातील निम्म्याहून अधिक मुले ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारी होती. पहिल्या १५ वर्षांत सर्वश्री कनवाडे, देशपांडे, हजारे, पाटील या शिक्षकांनी वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहिले. त्यानंतर दीर्घकाल कै. श्री. वि. ज. माने यांनी वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहिले. या वसतिगृहातर्फे छत्री उत्पादन व दुरुस्ती, सायकल दुरुस्ती यासारखे उपक्रम राबविण्यात आले.
३) गुरुकुल वसतिगृह :- जून १९७५ मध्ये पेईंग मुलांसाठी हे वसतिगृह सुरु करण्यात आले. द. म. ७५ ते ८० रुपयात मुलांची भोजनाची सोय होत असे. त्यातही गरजू मुलांना सवलत दिली जाई. श्री. सुधाकर प्रभुदेसाई या वसतिगृहाचे काम पहात शिवाय श्री. चंद्रमोहन गुळवणी, श्री. आर. बी. पाटील, श्री श्रीहरी काशीकर श्री. भागवत या शिक्षकांनीही काही काळ रेक्टर म्हणून काम पाहिले. प्रामुख्याने श्री. शंकरराव पेंढारकर सरांची या वसतिगृहावर देखरेख होती.
४) नवयुवती वसतिगृह :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या मुलांसाठी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने एक १ जुलै १९७५ रोजी आंतरराष्ट्रीय नारी वर्षात या वसतिगृहाची स्थापना झाली. या प्रतिज्ञात प्रारंभी २० मुली होत्या. या वसतिगृहाला ही पश्चिम जर्मनीतील टेरेडेस होम या संस्थेकडून आर्थिक सहाय्य माजी संस्कृत शिक्षिका सौ. वर्षा शरद काळे यांनी या वसतिगृहाची जबाबदारी १६ वर्षसमर्थपणे सांभा श्री. शरद काळे यांची देखरेख असे.
युवक कल्याण केंद्र :
दि. २७ फेब्रुवारी १९७० रोजी आमदार प्रकाश मोहाडीकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रामार्फत इंडियन कौन्सिल ऑफ सोशल वेलफेअरच्या सौजन्याने १० मुलांना मासिक आर्थिक मदत हॉलंड देशातून मिळवून दिली जाई. शिवाय मंडळामार्फत गरजू मुलांना पुस्तके, फ्री बुनिफॉर्म, एस. टी. पास इत्यादीसाठी आर्थिक मदत दिली जाई. युवक विकास शिबिरे भरवून विद्यार्थ्यांना बहुविध प्रगतीबाबत मार्गदर्शन करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला. या केंद्राचे काम श्री. मनोहर शंकरदासर पाहात.
बालकल्याण छंद वर्ग : इ. ५ वी ते ७ वीच्या मुलांसाठी असे सहा वर्ग दर बुधवारी दोन तास याप्रमाणे पुढील शिक्षिक चालवित असत. वाङमय मंडळ श्री. काळ, क्रीडा मंडळ श्री. अत्तार, विज्ञानमंडळ, श्री. म्हमाणे, संगीत नाट्य, श्री. आरोटे, व्यायाम मंडळ श्री. गवळी, स्कॉल, श्रीमती पंडित,
अमीर सारंग बाग:
एक एकर जमिनीत छोटी आमराई व भातशेतीला योग्य मळ्या तयार करण्यात आल्या. या योजनेसाठी १० हजार रुपयांचे देणगी देणारे श्री. गणीशेठ सारंग यांच्या वडिलांचे नांव या बागेला देण्यात आले. हा नामकरण समारंभ मुंबई येथील सुप्रसिद्ध सराफ श्री. नारायण गणेश शेट्ये यांचे अध्यक्षतेखाली शिक्षण संचालक श्री. चिपळूणकर साहेब यांचे हस्ते दि. ३० जाने. १९७८ रोजी खारेपाटण येथे पार पाडला.
समाजकेंद्र :
खारेपाटणची शाळा हे जितेजागते समाज केंद्र बनविण्याचा प्रयत्न वीर पेंढारकर सर यांनी प्रामाणिक पणे केला. भोवतालचा समाज शाळेत यावा म्हणून नेत्रशिबिरे, स्त्रीरोग चिकित्सा, क्लब, रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजिल्या १५ ऑगस्ट व २६ जानेवारी सारखे राष्ट्रीय दिन ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, व महिला मंडळ यांच्या सहकार्याने पार पाडले जातात. तसेच सहकार दिन बुध्दजयंती, पैगंबर दिन, पर्युषणपर्व, कालभैरव यात्रा इ. प्रसंगी शाळा स्थानिक संस्थांना सहकार्य इऊन समाजाशी एकरुप होण्याचा प्रयत्न करते. आधुनिक शिक्षणातील कार्यानुभव, स्काऊट गाईड पथके, तसेच कृषी कुक्कुट पालन, रेडिओ रीपेअरिंग व टेलरिंग हे विषय कार्यानुभवासाठी शिकविले जाऊ लागले.
रिझल्टस :
मार्च १९६९ मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत कुमार श्रीधर म. फडके हा आमचे शाळेचा विद्यार्थी ७९ टक्के गुण मिळवून देवगड केंद्रात पहिला आला. त्याला नॅशनल स्कॉलरशिपही मिळाली. मार्च १९७१ मध्ये ७७ टक्के गुण मिळवून कुमार शाम लवेकर हा कणकवली व देवगड तालुक्यात पहिला आला. त्यानेही राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविली. मार्च १९७७ मध्ये कुमार सुनिल पोयेकर ८१ टक्के गुण मिळवून खारेपाटण केंद्रात पहिला आला व त्यालाही नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. शालेय निकालाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. इ. ५ वी ते १२ वी पर्यंत त्यावेळी १४ वर्गात (रौप्य महोत्सवी वर्ष) ५५० मुले होती. तसेच ३५ जणाचा स्टाफ होता. १९७२ पासून खारेपाटण हायस्कूलमध्ये एस. एस. सी. परीक्षा केंद्रही झाले.
कृतज्ञता :
श्री. व्ही. व्ही गोखले यांनी परदेशीय मदत मिळविण्यात बहुमोल मार्गदर्शन केले. म्हणून त्यांचे तसेच टेरेडेस होम या संस्थेचे संयोजन श्री, आदी पटेल व इंडियन कौन्सल ऑफ सोशल वेलफेअरच्या श्रीमती रेवती सयानी यांचे खास आभार मानणे उचित होईल. पहिली ७-८ वर्ष डॉ. सोमण यांचे व नंतरची १७ वर्षे डॉ. गुणीजन यांचे मंडळाला बहुमोल अध्यक्षीय मार्गदर्शन लाभले. कै. श्री. अनंतराव देशमुख व के. श्री. फडकेभाऊ यांनी मंडळासाठी जीवापाड प्रेम केले. कै. श्री. भलूआण्णा रानडे श्री. मधुकर देवस्थळी, कै. श्री. चंद्रकांतशेठ डोर्ले श्री. अमृतराव राणे व डॉ. वसंतराव राणे यांनी योग्यवेळी योग्य सल्ला दिला. सौ. वत्सलाताई पेंढारकर यांनी शिक्षिका, पर्यवेक्षिका व आद्य मुख्याध्यापिका म्हणून शाळेची १५ वर्षाहून अधिक काळ सेवा केली. त्यांच्या प्रयत्नाने पालक स्त्री शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊ लागले. श्री. मनोहर काढणे, श्री. महाम्मूद ठाकूर, श्री. विनायकराव गाड, श्री. बा. वा. चिके, श्री. दादा ढमाले व श्री. अशोक सरवणकर हे कार्यकर्ते मंडळाचे कोणतेही काम हौशीने करीत असत. .